loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठे मोठे गार केले गंमतमध्ये !: मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल!

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याच्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे एक व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये "मोठे मोठे गार केले गंमतमध्ये" असा मजकूर शेअर केला आहे. या स्टेटसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही दिसत आहे. त्यामुळे या स्टेटसचा संबंध थेट ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीशी जोडला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या काही दिवसांपासून 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू होती. अखेर गुरुवारी ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची भूमिका घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शिंदे गटाकडून विजयाचे दावे केले जात आहेत.शिवसेनेचे आमदार परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी तर उघडपणे "ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात यशस्वी झाले आहे. सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास टाकला आहे . असे म्हटलेय

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg