loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पाऊस लांबणीवर, वृक्ष तोडीला आळा घालून पर्यावरण संवर्धन काळाची गरज

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - मृग नक्षत्राचे सात दीवस झाले तरी पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे दिसुन येत नाही. मे महिन्यासारखाच कडक उन्हाळा जाणवत आहे. यंदा भात पेरणीची कामे थांबली आहेत. पाऊस लांबणीवर गेला असल्यामुळे शेतीची सर्व कामांना उशीर होणार आहे. निसर्गामध्ये खुप लक्षणीय बदल झालेले दिसुन येत आहेत. मानवी जीवन आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे. आज झालेल्या बेसुमार वृक्ष तोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असून पाऊस लांबणीवर जाण्याचे हे मुख्य कारण असल्याचे निसर्गप्रेमींतून बोलले जात आहे. रोहिणी नक्षत्रापासूच पावसाची चाहूल लागते. मात्र मृग नक्षत्र अर्धे होत आले तरी पावसाचा थेंब नाही. पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे दिसुन येत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतकर्‍यांनी शेतीची मशागत करून पाऊस पडेल आणि भात पेरणी वेळेवर होईल, असे शेतकर्‍यांना वाटले होते. पण पावसाचा पत्ता नाही, शेतकर्‍यांना पेरा पडला असून यंदा शेतीचे खरे नाही, असे शेतकरी बोलू लागले आहेत. पुर्वी मृग नक्षत्र लागले की पावसाला सुरुवात व्हायची. परंतु गेल्या दहा बारा वर्षांपासून निसर्गामध्ये बदल जाणवू लागले आहेत. त्याचा फटका शेतकरी वर्गाला सतत बसत आहे. हवेत उष्णतेचे प्रमाण वाढले असून गारवा राहिलेला नाही. पाण्याची पातळीही खालावू लागली आहे. सजीव आणि त्यांच्या सभोवतालचे निर्जीव घटक यांच्यातील आंतरक्रियांमुळे नैसर्गिक पर्यावरण बनले असून मानवी अस्तित्वासाठी या घटकांचा समतोल असणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास प्रामुख्याने मानवी हस्तक्षेप कारणीभूत ठरत असल्याचे निसर्गप्रेमींतून बोलले जात आहे. बेसुमार झालेल्या वृक्ष तोडीमुळे हवामानातील समतोल बिघडला आहे. प्रदुषण वाढले आहे, सजिवांच्या विविध प्रजाती नष्ट झाल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

स्वच्छ हवा, पिण्याचे पाणी, अन्न आणि निवारा या मूलभूत गरजा पर्यावरणावर अवलंबून असल्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करून संवर्धन केल्यानंतर सजीवांच्या विविध प्रजातीचे संरक्षण होईल, तसेच मानवी आरोग्य सुधारण्यास मदत होऊन नैसर्गिक आपत्तीतील धोके कमी होतील. पर्यावरणाचे संरक्षण हे केवळ शासनाचे काम राहीले नसून प्रत्येक नागरिकाने आपले मुलभूत कर्तव्य म्हणून जबाबदारी पार पाडणे तितकेच महत्त्वाचे आहे. आज निसर्ग खुप बदलेला आहे हे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला आहे. रोहिणी नक्षत्र सुखे गेले मृग नक्षत्रात पाऊस पडेल की नाही? याची चिन्हे दिसून येत नाही. यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता पर्यावरणाचा समतोल ढासळू द्यायचा नसेल तर रत्नागिरी जिल्ह्यातील होणार्‍या वृक्ष तोडीला आळा घालून, वृक्ष संवर्धन हीच एकमेव उपाययोजना असल्याचे निसर्गप्रेमींतून बोलले जात आहे. संबंधित अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg