loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली चंद्रनगर येथे हॉटेल पायसदानची कंपाउंड वॉल कोसळून लाखोंचे नुकसान

संगलट (खेड) (इक्बाल जमादार) - एल निनोच्या प्रभावामुळे लांबलेल्या मौसमी पावसाने मुसळधार काल रात्रीपासून बॅटिंग सुरू केली. पहिल्याच पावसाचा दणक्यामध्ये दापोली तालुक्यातील चंद्रनगर येथील रमेश भुवड यांच्या हॉटेल पायसदानची कंपाउंड वॉल कोसळली आहे. रमेश भुवड यांनी दिलेला माहितीनुसार सुमारे साठ फूट लांबीची पक्की चिरे बांधकाम असलेली कंपाउंड वॉल ही रस्त्यालगत असून काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या दाबामुळे कोसळल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामुळे रमेश भुवड यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे. दापोली चंद्रनगर या मुख्य रस्त्यावर असलेल्या हॉटेल पायसदानची कंपाउंडवॉल कोसळल्यामुळे वाहतूकदारांनी या ठिकाणाहून जाताना सावधानता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या ठिकाणी कोणताही अपघात होऊ नये, याकरिता रमेश भुवड यांनी रस्त्याच्या बाजूने चिरे लावून ठेवले आहेत. सदर घटनेची माहिती चंद्रनगर चे प्रशासक सकपाळ यांना दिली असल्याची माहिती भुवड यांनी दिली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg