loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलचा मोहम्मद अर्श राजीवटे व अब्दुल हादी नाडकर भारतीय सागरी विद्यापीठ प्रवेश परीक्षा (IMU CET) उत्तीर्ण

खेड - दिनांक 24 मे 2026 रोजी घेण्यात आलेल्या भारतीय सागरी विद्यापीठ प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये रोटरी स्कूलचे विद्यार्थी मोहम्मद अर्श राजीवटे व अब्दुल हादी नाडकर यांनी उज्ज्वल यश संपादीत करुन रोटरी स्कूलचे नाव गौरवित केले. सदर परीक्षेसाठी संपूर्ण देशभरातून 72,000 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यामध्ये रोटरी स्कूलच्या मोहम्मद अर्श राजीवटे व अब्दुल हादी नाडकर यांनी आपला सहभाग नोंदवून रोटरीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय सागरी विद्यापीठ (IMU CET) व्दारे घेण्यात येणारी IMU CET ही राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा असून या परीक्षेव्दारे मरीन इंजिनिअरिंग, नॉटिकल सायन्स, नेव्हल आर्किटेक्चर आणि इतर सागरी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. व्यापारी नौदल आणि सागरी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे रोटरी स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

टाईम्स स्पेशल

मोहम्मद अर्श राजीवटे व अब्दुल हादी नाडकर या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी मोहम्मद अर्श राजीवटे व अब्दुल हादी नाडकर याचे कौतुक करुन पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg