loader
Breaking News
Breaking News
Foto

अंबरग्रीस तस्करी प्रकरणातील दोन्ही आरोपींना जामीन मंजूर; ॲड. सिद्धेश बुटाला यांचा न्यायालयात युक्तिवाद यशस्वी

खेड : खेड रेल्वेस्थानक परिसरातून सुमारे १० किलो अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त केल्याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने अटक केलेल्या दोन्ही आरोपींना खेड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने प्रसिद्ध वकील ॲड. सिद्धेश संजय बुटाला यांनी केलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने मान्य करत हा दिलासा दिला.१६ जून २०२६ रोजी पहाटे दापोली सीमाशुल्क विभागाने खेड रेल्वे स्थानक परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर एका कारमधून १० किलोहून अधिक अंबरग्रीस जप्त केले होते. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत अंबरग्रीस बाळगणे आणि त्याची विक्री करणे प्रतिबंधित असल्याने, याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने सुरुवातीला आरोपींना ३० जून २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आरोपींच्या जामीन अर्जावर खेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी आरोपींच्या वतीने *ॲड. सिद्धेश संजय बुटाला* यांनी बाजू मांडली. त्यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यातील तरतुदी आणि आरोपींच्या भूमिकेवर त्यांनी सविस्तर कायदेशीर प्रकाश टाकला.या यशस्वी युक्तिवादामुळे कायदेशीर वर्तुळात ॲड. सिद्धेश बुटाला यांच्या बचावात्मक कौशल्याचे विशेष कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg