सावंतवाडी (प्रतिनिधी) : सकल मराठा समाज, सिंधुदुर्गच्या वतीने १० वी, १२ वीच्या परीक्षेत आणि विविध क्षेत्रांत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच मराठा समाजातील मान्यवरांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित राहून आ. निलेश राणे यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आज आम्ही जे व्यासपीठावर तुमचा गौरव करीत आहोत हे व्यासपीठ सहज मिळालं नाही. माझ्या स्वतःच्या आयुष्यातही मला मोठा संघर्ष करावा लागला. अनेक अपयशांचा सामना केल्यानंतर अखेर यश मिळाले. त्यामुळे आयुष्यात कष्ट आणि संघर्ष अत्यंत महत्त्वाचा आहे. आज या व्यासपीठावर जी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत, ती सर्वजण मोठा संघर्ष करूनच या पदापर्यंत पोहोचली आहेत.
विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, "जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा की तुमच्या माध्यमातून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उत्पन्न आणि नाव दोन्ही वाढेल. 'कामयाब नही, काबिल बनो'... स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल. स्वतःची कर्तृत्वाची रेषा अशी आखा जी कोणालाही पुसता येणार नाही, यासाठी निरंतर कार्यरत राहा, असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी केले. माझ्या पडत्या काळात ज्या काही मोजक्या लोकांनी मला प्रोत्साहन दिले आणि आधार दिला, त्यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे सीताराम गावडे. आपल्या समाजातील गुणवंत मुला-मुलींना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, या उदात्त उद्देशाने सकल मराठा समाजाच्या माध्यमातून ते गेली अनेक वर्षे या कौतुक सोहळ्याचे सातत्याने आयोजन करत आहेत. १० वी आणि १२ वी नंतर पुढे नेमकं काय करायचं, याचे योग्य मार्गदर्शन या व्यासपीठावरून विद्यार्थ्यांना मिळते, असे ते म्हणाले.


























































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.