loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणसह जिल्हाभरात दीड महिन्यानंतर शाळा पुन्हा गजबजल्या; विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत

मालवण (प्रतिनिधी) - दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नंतर आज मालवणसह जिल्हाभरातील शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आगमनाने गजबजल्या. सर्वच शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेशोत्सवाचा उत्साह दिसून शाळांकडून विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्वक व आनंदमयी वातावरणात स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीतील नवागतांचेही उत्साही स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुट्टी कालावधीनंतर आजपासून शाळा पुन्हा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. सुट्टीत मौजमजा केल्यानंतर अज विद्यार्थ्यांनी नवीन गणवेश, दप्तर, वह्या व इतर शालेय साहित्यासह शाळेत प्रवेश केला. शाळांकडून विविध प्रकारे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. रस्त्यावरून शाळेपर्यंत स्वागत मिरवणूक करीत, विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करीत तसेच औक्षण करीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मिठाई व खाऊ वाटपही करण्यात आले. तर प्रथमच शाळेत येणाऱ्या इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागतांचे देखील विशेष व उत्साही स्वागत करण्यात आले. तसेच शाळांकडून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटपही करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला.

टाईम्स स्पेशल

नव्या शैक्षणिक वर्षासाठी शाळाही सज्ज झाल्या असून विद्यार्थ्यांच्या आगमनाने शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट घुमला आहे. दीर्घ सुट्टी नंतर आपले मित्र मैत्रिणी पुन्हा भेटल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद विलसत होता. तसेच मुलांना ज्ञानदान करण्यासाठी शिक्षकांनीही कंबर कसली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षणप्रेमी नागरिक, सेवाभावी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर काहींकडून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg