loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग जि. प. केंद्र शाळेच्या आवारात शिवसेना उप जिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर यांच्याकडून स्वखर्चाने काँक्रीटीकरण

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर 1 आवारात चिखल मातीमुळे पहिली ते सातवीपर्यंत मुलांना यातून ये-जा करावी लागत होती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते माजी उपसभापती, शिवसेना उप जिल्हा प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आपल्यावर तातडीने हालचाल करून शाळेच्या आवारात मुलांची ये-जा असलेल्या मार्गावर सिमेंट काँक्रीटीकरण करून मुलांची चिखलातून सुटका केली. निंबाळकर यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर 1. आवारात पाऊस पडला कि चिखल होत होता. यात गुरांचा वावर यामुळे चिखल मातीतून मुलांना वाट काढावी लागत होती. यामुळे शाळेत पण चिखल माती जात होती. ही बाब राजेंद्र निंबाळकर यांच्या निदर्शनास आली. राजेंद्र निंबाळकर यांनी तातडीने आपली यंत्रणा कामाला लावली. लगेच खडी, वाळू, सिमेंट, मिक्सर आणून कामगार मार्फत मुलांचा मार्ग ते शाळेच्या आवारात संपूर्ण सिमेंट काँक्रीटीकरण करून दिले.

टाईम्स स्पेशल

यामुळे शाळेच्या आवारात मुलांना आता चिखल माती ऐवजी चांगल्या सिमेंट काँक्रीटीकरण वाटेचा वापर करून जाणे सोयीस्कर झाले आहे. राजेंद्र निंबाळकर यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg