loader
Breaking News
Breaking News
Foto

अयोध्येतील सोने-चांदी, हिरे-माणिक आणि अष्टधातूच्या १२५० शिळा गायब कशा झाल्या? कुणी नेल्या?

अयोध्या - अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीतून देणगीच्या रकमा लंपास केल्याप्रकरणी एक मोठा वाद समोर आला आहे。 काही कर्मचाऱ्यांनी दानपेट्यांमधील कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप असून, त्यापैकी काहींच्या घरांतून रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे。 या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने विशेष तपास पथक (SIT) ची स्थापना केली आहे。 अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणग्यांची चोरी काही नवीन नाही. धर्मसेनेचे संस्थापक संतोष दुबे यांचा दावा आहे की, 1989 मध्ये अनेक गाव, शहरे व देश -विदेशातून पूजित होऊन अयोध्येत आलेल्या सोने-चांदी, हिरे-माणिक आणि अष्टधातूच्या 1250 शिळा आता 'गायब' झाल्या आहेत.या शिळा 2002 पर्यंत कारसेवकपुरममध्ये होत्या. मातीच्या पूजित शिळा आजही कारसेवकपुरममध्ये ठेवलेल्या आहेत, परंतु धातूच्या शिळा कुठेही दिसत नाहीत. संतोष दुबे यांच्या मते, सोने-चांदीच्या शिळांच्या देखभालीची जबाबदारीही ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्याकडे होती.या शिळा कारसेवकपुरममध्ये जिथे सुरक्षित ठेवल्या होत्या, तिथे 3 कुलूपे होती. मग या शिळा कुठे गायब झाल्या, हे कोणालाही माहीत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्रीराम मंदिर आंदोलनाशी संबंधित संतोष दुबे यांनी सांगितले की 'श्रीराम मंदिरासाठी 1985 मध्ये 'श्रीराम जन्मभूमी न्यास' स्थापन झाला. त्याचे अध्यक्ष परमहंस रामचंद्र दास होते. न्यासात विहिपचे अशोक सिंघल, गिरिराज, रामविलास वेदांती, चंपत राय यांच्यासह अनेक लोक होते.श्रीराम मंदिर आंदोलनाला गती देण्यासाठी 1989 मध्ये विहिपने पहिली मोठी मोहीम सुरू केली. घोषणा देण्यात आली- 'सवा रुपया दे दे रे भैय्या रामशिलेच्या नावाचा, रामाच्या घरात लागेल दगड तुझ्या नावाचा.' या अभियानात विहिपने प्रत्येक व्यक्तीला सव्वा रुपया, म्हणजे एका घरातून 5 ते 10 रुपये देणगी देण्यास सांगितले. त्याचबरोबर घरोघरी जाऊन पूजित शिळाही मागितल्या.

टाइम्स स्पेशल

संतोष दुबे दावा करतात, 'सोन्या-चांदीच्या आणि अष्टधातूच्या या शिळांची एकूण संख्या 1250 होती. परमहंस रामचंद्र दासजी सांगायचे की, या शिळांमध्ये सर्वात महागडी शिळा मॉरिशसची होती. मुंबईच्या एका व्यापाऱ्याने जी शिळा पाठवली होती, त्यावर हिरे जडवलेले होते. सर्वात जास्त चांदीच्या, त्यानंतर सोन्याच्या शिळा होत्या.'या शिळा ट्रस्टचे अध्यक्ष परमहंस रामचंद्र दास यांच्या निर्देशानुसार विश्व हिंदू परिषदेचे (विहिप) आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्या होत्या. शिळांच्या सुरक्षेसाठी त्या जिथे ठेवल्या होत्या, तिथे 3 कुलूपे लावण्यात आली होती. 2002 पर्यंत या शिळा तिथे होत्या. त्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही.संतोष दुबे म्हणतात, 'यामागे चंपत राय यांची भूमिका आहे. ते दावा करतात की परमहंस रामचंद्र दास याच धक्क्याने आजारी पडले आणि 2 वर्षांनी त्यांनी प्राण सोडले. डॉ. रामविलास वेदांती भीतीमुळे बोलू शकले नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg