दापोली (वार्ताहर) : जुन्या नाण्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून दापोलीतील एका ज्येष्ठ नागरिकाची १६ लाख ८० हजार २५० रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबद्दल दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल जानराव राणे (वय ५९, रा. पांगारवाडी, दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १५ मार्च २०२६ ते २१ मे २०२६ या कालावधीत साहिल कुमार व विशाल सिंह (पूर्ण नाव व पत्ता अज्ञात) यांनी फिर्यादी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला व जुन्या नाण्यांच्या विक्रीसाठी मोठी रक्कम व कमिशन मिळवून देण्याचे आश्वासन देत विविध शुल्क व प्रक्रियेच्या नावाखाली वेळोवेळी ऑनलाइन रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार राणे यांनी १६ लाख ८० हजार २५० इतकी रक्कम त्यांना ऑनलाइन पाठवली.
मात्र, आश्वासित मोबदला किंवा परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे राणे यांच्या लक्षात आले व त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात या दोन संशयिताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१८(२), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० च्या कलम ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर करीत आहेत.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.