loader
Breaking News
Breaking News
Foto

मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी - आंतरराष्ट्रीय योग दिनाचे डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ अंतर्गत शिरगाव, रत्नागिरी येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन आणि झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २१ जुने २०२६ रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ औचित्य साधून मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे सकाळच्या सत्रामध्ये योग प्रशिक्षणाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाद्वारे सर्वांगीण आरोग्यासाठी योगासनांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रा. निलेश मिरजकर यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना योगासनांचे मार्गदर्शन केले. निलेश मिरजकर हे मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ते आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे प्रशिक्षक असून गेल्या दहा वर्षांपासून योगा, प्राणायाम आणि ध्यान यांचे प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी विविध योगासने, ध्यान आणि प्राणायामाच्या क्रिया प्रत्यक्ष करून दाखवल्यात, ज्याचा लाभ उपस्थित सर्वांना झाला. सर्व उपस्थितांनी प्रत्यक्ष योगा करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना डॉ. केतन चौधरी, प्राचार्य, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी, यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचे आणि सूर्यनमस्कारांचे अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले. नियमित योगाभ्यासाने मानसिक शांतता आणि शारीरिक आरोग्य कशा प्रकारे उत्तम राहते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे असे त्यांनी सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे आदरणीय कुलगुरू डॉ. संजय भावे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. राजेश ठोकळ, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या सोहळ्याला मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन आणि सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मनोज घुघुसकर व प्रा. सचिन साटम, सहाय्यक संशोधन अधिकारी, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, तर मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्रा. डॉ. राकेश जाधव, प्रा. तौसीफ काझी, प्रा. मयुरी डोंगरे, डॉ. सुशिल कांबळे, सचिन पावसकर, सुरेश हातगळे, सिद्धेश कांबळे, अभिजित पाटील, अभिजित शिरगावकर, प्रविण भाटकर व प्रविण गायकवाड हे उपस्थित होते. मत्स्य तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला. सर्वांनी उत्साहाने योगासने करून योग दिनाचा संकल्प केला.

टाईम्स स्पेशल

योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य भेट आहे. आंतरराष्ट्रीय योग दिना मुळे ही प्राचीन विद्या जगभर पोहोचली असून, लोक आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याचे महत्त्व मान्य करत आहेत. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो, ज्याला उत्तर गोलार्धात विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. या दिवशी निसर्गात ऊर्जेचे प्रमाण अधिक असते, जे योगाभ्यासासाठी अत्यंत पूरक मानले जाते. आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एक उत्सव नसून, ती निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची एक चळवळ आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की, स्वतःच्या आरोग्यासाठी दररोज थोडा वेळ काढणे आवश्यक आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg