पनवेल :- केंद्र शासन व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यभर जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांचे प्रकल्प राबविले गेले. मात्र पनवेल तालुक्यात जल जीवन मिशनच्या योजना राबवत असतांना अनेक ठिकाणी नळ पाणी पुरवठा योजना या अर्धवट अवस्थेत दिसत आहेत. मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत अनेक ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत केलेली कामे अपूर्ण, निकृष्ट दर्जाचे आहेत. शिवाय अद्यापही नळ पाणी पुरवठा योजना या लोकांच्या सेवेत आली नाही. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत असणारी नळ पाणी पुरवठा योजना योग्य प्रकारे व शासनाच्या नियमानुसार होण्यासाठी मालडुंगे ग्रामपंचायत सदस्य उषा वारगडा व ग्राम विकास संघर्ष समितीच्या वतीने गणपत वारगडा यांनी जवळ पास 3 वर्षांपासून ग्रामपंचायतकडे अर्ज, मासिक सभा व ग्रामसभे मध्ये विषय मांडले. परंतु त्या विषयाच्या नुसार कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर किंवा चौकशी अहवाल तयार केला नाही.
तसेच रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा व पनवेल पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे देखील सातत्याने पत्रव्यवहार केले होते, मात्र तिथेही चौकशी अहवाल न बनवता उलट उडवा उडवीचे उत्तर देत ठेकेदारंची बाजू घेत असल्याचे दिसत होते. असे असतांना ग्रामपंचायत सदस्य उषा वारगडा व ग्राम विकास संघर्ष समितीच्या वतीने गणपत वारगडा यांनी पाठपुरावा सोडला नाही. गावातील लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी आणि घरोघरी नळ असण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना शासनाच्या नियमानुसार व चांगल्या दर्जाचे काम होण्यासाठी जवळ पास 3 वर्षांपासून शासनाच्या दरबारी भांडत व पत्रव्यवहार करत करत राहिले. तसेच जल जीवन मिशन योजनेसाठी शासनानी करोडो रुपये खर्च केले तरी आजही ग्रामपंचायत हद्दीतील गाव, वाड्या-पाडयांना टँकरने पाणी पुरावठा केला जात आहे.
मग, जल जीवन मिशन योजनेचा फायदा काय? असे अनेक प्रश्न उपस्थित करून अखेर पनवेल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समीर वठारकर यांनी या घटनेचे आढावा घेऊन ग्रामीण पाणी पुरवठा उप विभाग पनवेलचे कनिष्ठ अभियंता निरंजन बनकर यांना सदर ठिकाणी समक्ष जाऊन चौकशी सद्यस्थितिची पाहणी त्याबाबतचा वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे स्पष्ट सुचना दिल्या आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.