loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदूर्ग राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, अध्यक्ष कृष्णा आडणेकर

सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुणगौरव केला जाणार आहे. संस्थेमार्फत सभासदांच्या गुणवंत मुलांचा गुणगौरव व सत्कार वार्षिक अधिमंडळ सभेत केला जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णा (प्रकाश) आडणेकर यांनी दिली. पतसंस्थेच्या सभासदांच्या सर्व उत्तीर्ण मुलांचे संस्थेतर्फे त्यांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यापूर्वी वार्षिक अधिमंडळ सभेत ठरल्यानुसार तालुकास्तरावर गुणानुक्रम दिला जाणार आहे. ज्या सभासदांची मुले फेब्रुवारी /मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी ,१२ वी (चारही शाखा) तसेच इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये ६० टक्के पेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेली आहेत, अशा तालुकास्तरावर सर्वोच्च पहिल्या तीन विद्यार्थ्यांची गुणगौरवसाठी निवड केली जाणार आहे. गुणगौरव पात्र विद्यार्थ्यांनाच सत्काराकरीता दिनांक २६ जुलै २०२६ च्या वार्षिक सभेत निमंत्रित केले जाणार आहे.

टाईम्स स्पेशल

तरी ज्या सभासदांची मुले वरील नमूद परीक्षांना किमान ६० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाली आहेत, अशांनी आपल्या मुला-मुलींची गुणपत्रिका सत्य प्रत व आवश्यक माहिती (सभासदाचे नाव, कार्यालय, सभासद क्रमांक, फोन नंबर इत्यादी) सह संस्थेकडे दिनांक २० जुलै २०२६ पूर्वी अर्ज सादर करावेत, त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कृष्णा(प्रकाश) आडणेकर व सर्व संचालकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg