खेड (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण राज महाडिक यांच्या २७ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उत्तर रत्नागिरीचे सरचिटणीस मिलिंद नांदगावकर यांच्या संकल्पनेतून व वैभवजी खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. खेड शहरातील पोलीस स्टेशनसमोरील पाथरजाई मंदिर सभागृहात पार पडलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाला नागरिक व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन खेड शहरातील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. संजीव धारिया यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये एकूण ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सतीश दादा मोरे, दापोली पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अमोल बोरस्कर, संजय आखाडे, खेड शहराध्यक्ष नंदूजी साळवी, माजी नगराध्यक्षा पूनमताई शेटे-पाटणे, बाबुशेठ नांदगावकर हॉस्पिटलचे विवेक कदम, खेड नगरपालिकेतील गटनेते रहीमभाई सईबोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. संजीव धारिया यांनी युवकांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. "युवकांच्या पाठीशी मी कायम उभा आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक संदेश जातो. भविष्यातही अशा कार्यक्रमांसाठी लागणारे सहकार्य करण्यास मी सदैव तयार आहे," असे सांगत त्यांनी युवा वर्गाला शुभेच्छा दिल्या.
शिबिराला बॉम्बे ब्लड ऑर्गनायझेशनचे विक्रांत जाधव तसेच मदत ग्रुप ऑफ खेडचे प्रसाद गांधी यांनीही उपस्थित राहून सहकार्य केले. रक्तदानासाठी अधिकाधिक युवकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास स्मार्ट वॉच किंवा एअरबड्स भेटवस्तू म्हणून देण्यात आले. समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामुळे गरजू रुग्णांसाठी रक्तसाठा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, युवकांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.




































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)



































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.