loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये वाहनामुळे वाहतुकीस अडथळा; चालकाविरूद्ध गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) - शहरातील निवाचा चौक परिसरात रस्त्याच्या मध्यभागी मालवाहू टेम्पो उभा करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका चालकाविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास बाजारपेठ येथील सरस्वती साडी सेंटरसमोर निवाचा चौक परिसरात सुधीर बाळाराम पवार (वय ४८, रा. चिंचघर बौद्धवाडी, ता. खेड) यांनी त्यांच्या ताब्यातील अशोक लेलँड कंपनीचा पांढऱ्या रंगाचा मालवाहू टेम्पो (क्र. एमएच-०८-एपी-७५४५) रस्त्याच्या मध्यभागी उभा केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर वाहनामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना धोका निर्माण झाला असून वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. वाहन उभे करून चालक तेथून निघून गेल्याने सार्वजनिक रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार तेजस्विनी उमेश जाधव यांनी फिर्याद दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg