दापोली, (वार्ताहर) : दापोली तालुक्यातील भूस्खलन व अतिवृष्टीच्या धोकादायक पार्श्वभूमीवर महसूल विभागाने २४० कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा बजावल्या आहेत. जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारीची पावले उचलली असली, तरी धोकादायक ठिकाणांवरील समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. दापोली तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात भूस्खलन आणि अतिवृष्टीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे संवेदनशील भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या जातात. यंदाही हर्णे, आसूद, दाभोळ, पालगड, आंजर्ले, उन्हवरे, मुरूड, गुडे, फरारे, बांदी, टवसे आदी गावांतील धोकादायक ठिकाणी राहणार्या २४० कुटुंबांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक कुटुंबे गेली अनेक दशके याच ठिकाणी वास्तव्यास असून काही घरे ५० ते ६० वर्षांहून अधिक जुनी आहेत. घरांच्या मागील बाजूस डोंगरकडे, भिंती किंवा उतार असल्याने प्रत्येक पावसाळ्यात भीतीचे वातावरण निर्माण होते. प्रशासन दरवर्षी नोटिसा देऊन जबाबदारी झटकत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे.
स्थानिकांच्या मते, काही ठिकाणी संरक्षण भिंती उभारण्यात आल्या असल्या तरी भूस्खलनाचा धोका पूर्णपणे कमी झालेला नाही. दरम्यान, केंद्र व राज्य शासनाच्या विविध गृहनिर्माण योजनांद्वारे पात्र कुटुंबांना सुरक्षित घरे उपलब्ध करून देण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी नोटिसा, स्थलांतर आणि पुन्हा त्याच ठिकाणी परतण्याचे चक्र थांबवून दीर्घकालीन पुनर्वसनाचा मार्ग स्वीकारावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क असले तरी २४० कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून कायमस्वरूपी उपाययोजना नेमक्या कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.







































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.