loader
Breaking News
Breaking News
Foto

जि प प्रा शाळा वेहेळे नं. 1 येथे माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा ओघ

चिपळूण (सत्यवान विचारे) - जि प प्रा शाळा वेहेळे नं.1 येथे सर्व समित्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेस सर्व सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी, केंद्रप्रमुख व सर्व शिक्षक उपस्थित होते. शाळेचे माजी विद्यार्थी उदय जंगम यांनी शाळेला एक लोखंडी कपाट व शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी एक लोखंडी मांडणी भेट दिली. तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी नसूनही गावातील शाळेच्या गुणवत्ता विकासास हातभार म्हणून गजानन पिटले, नितीन पिटले व गौरव पिटले यांनी शाळेला 43 इंची स्मार्ट टीव्ही भेट दिली. त्यांच्या या पुढाकाराने शाळेतील अनेक माजी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक अधिक मेहनत करतील अशी भावना कान्हे केंद्राच्या केंद्रप्रमुख वैशाली जाधव यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सन 2025- 26 मध्ये नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविलेल्या शाळेचा विद्यार्थी सुबोध सुभाष गमरे याचा उपस्थितांमार्फत सत्कार करण्यात आला. तसेच वेळोवेळी शाळेला सहकार्य करणाऱ्या सर्व पालकांचे व ग्रामस्थांचेही आभार मानण्यात आले. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय कै. बापूसाहेब खेडेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांची कन्या स्नेहा खेडेकर यांनी शाळेला वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रोख रक्कम 7001 शाळेला दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानून कौतुकही करण्यात आले. सध्या या शाळेत सरोज निगुडकर व रसिका मस्के या दोन शिक्षिका कार्यरत असून त्या शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे समाधान पालकांनी व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg