loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी शहराच्या विकासासाठी महायुती सरकारकडून तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या विकासासाठी महायुती सरकारने तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याने शहरातील विविध प्रभागांतील विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष दादा ढेकणे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या प्रक्रियेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक अनिकेत पटवर्धन यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १, २, ३, ७, १०, ११ आणि १५ मधील विविध विकासकामांसाठी शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी मिळाली. शासनाच्या दोन स्वतंत्र योजनांमधून रत्नागिरी नगरपरिषदेस ३ कोटी ८० लाख २७ हजार रुपये आणि ७९ लाख ७३ हजार रुपये असा एकूण ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निधीतून शहरातील विविध भागांमध्ये भूमिगत गटारे बांधणे, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, उद्यानांचा विकास, एलईडी दिवे व सौर दिवे बसविणे, पाणीपुरवठा विषयक कामे, खुली व्यायामशाळा उभारणे तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत. विशेषतः पावसाळ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी निचऱ्याच्या समस्यांवर या कामांमुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांनंतर काही राजकीय विरोधकांकडून टीकेचे सूर उमटत असताना, प्रत्यक्षात मोठा विकासनिधी शहरासाठी खेचून आणण्यात यशस्वी ठरलेल्या अनिकेत पटवर्धन यांनी आपल्या कामगिरीतून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. शासन, पक्ष नेतृत्व आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये प्रभावी समन्वय साधत त्यांनी प्रस्तावांना गती दिली. परिणामी अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत प्रतिक्रिया देताना दादा ढेकणे यांनी महायुती सरकारच्या विकासाभिमुख धोरणांचे कौतुक केले. पक्ष नेतृत्वाच्या भक्कम पाठबळामुळे शहरातील विकासकामांना चालना मिळाली असून आगामी काळातही नागरिकांच्या हितासाठी अधिकाधिक निधी आणण्याचा प्रयत्न सुरू राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत आणि अनिकेत पटवर्धन यांचे त्यांनी आभार मानले. रत्नागिरीसाठी तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करून विकासकामांना गती देण्यात अनिकेत पटवर्धन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निवडणुकीनंतर टीकेची धार वाढविणाऱ्यांना प्रत्यक्ष विकासनिधी आणून त्यांनी कामातूनच सणसणीत चपराक दिल्याची चर्चा शहरात रंगली आहे. महायुती सरकार, पक्ष नेतृत्व आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील प्रभावी समन्वयामुळे रत्नागिरीच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg