loader
Breaking News
Breaking News
Foto

जामसूत जांभूर्णेवाडीत ५५ उपयुक्त वृक्षांचे वृक्षारोपण, झाडे दत्तक घेण्याचा उपक्रम

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील जामसूत येथील श्री संत गोरोबाकाका सेवा मंडळ व संत जनाबाई महिला मंडळ, जांभुर्णेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम जांभुर्णेवाडी परिसरात पार पडला. पर्यावरण संवर्धन आणि हरित ग्राम संकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या उद्देशाने मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमात वड, पिंपळ, करंज, बकुळ, जांभूळ, ताम्हण, कांचन, बहावा आदी मानवजातीस उपयुक्त अशा विविध प्रजातींची एकूण ५५ झाडे लावण्यात आली. विशेष म्हणजे सर्व महिला व पुरुष सदस्यांनी आपल्या नावाने झाडे लावून ती दत्तक घेण्याचा संकल्प केला. त्यामुळे या झाडांचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारीही प्रत्येकाने स्वीकारली आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा आणि समाजात वृक्षप्रेम रुजविणार्‍या या उपक्रमाचे उपस्थितांकडून विशेष कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg