loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळ ग्रा.पं.च्या विशेष ग्रामसभेत सोडतीविना झालेल्या आरक्षणाला ग्रामसभेचा विरोध

दाभोळ (वार्ताहर) - तालुका निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार नुकतीच दाभोळ ग्रामपंचायत निवडणूक २०२६ करिता आरक्षण सोडत घेण्याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. आरक्षण निश्चितीची प्रक्रिया सार्वजनिक व पारदर्शक पद्धतीने सोडत काढून केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. सदर प्रक्रियेचे नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. या ग्रामसभेसाठी गणेश बाळू पारधी हे अध्यायी अधिकारी ग्रामपंचायत दाभोळ म्हणून उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मागील निवडणुकीचे आरक्षण वाचून दाखवून येणाऱ्या निवडणुकीचे आरक्षण सोडत न घेता तालुकास्तरावरून लेखी स्वरूपात आणलेले कागदपत्रे वाचून दाखविण्यात आली. सदर बाब उपस्थित ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली असता मला हे वरिष्ठांनी असेच दिले आहे, असे सांगितले. सदर प्रक्रिया चुकीची व आम्हाला मान्य नाही अशी हरकत ग्रामस्थांनी घेतली व तसा ठराव मांडला. त्यामुळे अधिकारी पारधी यांनी दाभोळ ग्रामस्थांची निवडणूक प्रक्रियेवरील हरकत तालुका निवडणूक अधिकारी यांना कळविण्याचे व पुढील निर्णय दाभोळ ग्रामपंचायत मार्फत नागरिकांना सांगण्याचे जाहीर करून विशेष ग्रामसभा समाप्त केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg