loader
Breaking News
Breaking News
Foto

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र

पनवेल : दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लावण्यात यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. पनवेल- नवी मुंबई परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे राहिले आहे. काही महिन्यांपूर्वी ते सुरू देखील झाले. मात्र अद्याप देखील या विमानतळाचे नामकरण झालेले नाही. येथील प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांनी या विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी वारंवार मागणी केली. मात्र अद्याप देखील या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही. यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढण्यात आली. उपोषण देखील करण्यात आले मात्र शासन दरबारी आश्वासन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केंद्र शासनाकडून विमानतळाचे नामकरण केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी देखील अनेकदा या विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे, अशी आग्रहाची मागणी केली. 24 जून रोजी दि.बा.पाटील यांच्या जयंती निमित्ताने राजेंद्र पाटील यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव लावण्यात यावे, यासाठी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आणि आता तरी दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg