loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड पोलिसांसाठी मॉक मॉब डिस्पर्सल ड्रिल; कायदा-सुव्यवस्था हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षण

खेड (प्रतिनिधी) : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तसेच बेकाबू जमावाकडून सरकारी मालमत्तेचे नुकसान होण्याची शक्यता असताना परिस्थिती प्रभावीपणे हाताळता यावी यासाठी खेड पोलिसांसाठी मॉक मॉब डिस्पर्सल (जमाव पांगविणे) ड्रिलचे आयोजन करण्यात आले. शहरातील गोळीबार मैदान येथे हे विशेष प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणादरम्यान बेकायदेशीर जमाव नियंत्रणात आणणे, जमाव पांगविण्याच्या विविध पद्धती, सुरक्षा उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांनी घ्यावयाची भूमिका याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी नीलेश बोकेफोडे यांनी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सविस्तर प्रशिक्षण देत विविध परिस्थितींमध्ये जमाव नियंत्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रांची माहिती दिली. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष सराव करून घेण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक बेले, उपविभागीय पोलीस अधिकारी सनस, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्यासह तालुक्यातील विविध पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

या प्रशिक्षणामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास खेड पोलीस अधिक प्रभावीपणे आणि सक्षमपणे परिस्थिती हाताळण्यास सज्ज झाले असून, आपत्कालीन प्रसंगी तातडीने आणि समन्वयाने कार्य करण्यासाठी त्यांची तयारी अधिक बळकट झाल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg