संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्याच्या विकासाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा मोठा टप्पा गाठला गेला असून देवरुखजवळील बुरंबी येथे तब्बल १६ एकर जागेत भव्य ‘ईएचव्ही’ पॉवर हाऊस उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. देवरुख महावितरणचे उपकार्यकरी अभियंता राणे यांनी क्रांती व्यापारी बैठकीत महिती दिली. या निर्णयामुळे तालुक्याच्या विजेच्या स्वयंपूर्णतेच्या दिशेने मोठी झेप घेतली गेली असल्याची भावना व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देवरुख आणि परिसरातील नागरिक, व्यापारी, उद्योजक आणि पर्यटन व्यवसायिकांना वारंवार होणार्या वीज खंडिततेचा सामना करावा लागत होता. आरवली येथून सुमारे ५५ किलोमीटर लांबीच्या जंगल, डोंगर-दर्या आणि नद्या ओलांडणार्या लाईनवर अवलंबून असलेल्या देवरुखसाठी हा प्रश्न गंभीर बनला होता. याच समस्येचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी क्रांती व्यापारी संघटनेने व्यापक अभ्यास करून बुरंबी येथे ‘ईएचव्ही’ पॉवर हाऊस उभारण्याची मागणी लावून धरली होती.
या मागणीला आमदार शेखर निकम यांनी विधानसभा आणि मंत्रालय स्तरावर भक्कम पाठबळ दिले. ऊर्जामंत्रालयानेही या विषयाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक कार्यवाहीला गती दिली आणि अखेर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. ईएचव्ही (ईक्ट्रा हाय व्होल्टेज) पॉवर हाऊस हे उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमधून येणारी वीज स्थानिक वितरणासाठी योग्य दाबात रूपांतरित करणारे अत्यंत महत्त्वाचे केंद्र असते. अशा केंद्रामुळे वीज पुरवठा अधिक सक्षम, स्थिर आणि विश्वासार्ह बनतो. या प्रकल्पामुळे देवरुखला होणारे प्रमुख फायदे यामध्ये वारंवार होणार्या वीज खंडिततेत मोठी घट, कमी अंतरावरून वीज पुरवठा झाल्याने दुरुस्ती जलद, उद्योगधंद्यांना दर्जेदार आणि अखंड वीज, नवीन उद्योग आणि गुंतवणुकीला चालना, पर्यटन प्रकल्पांना आवश्यक ऊर्जा उपलब्धता, भविष्यातील एमआयडीसी विस्तारासाठी भक्कम पायाभूत सुविधा, संपूर्ण संगमेश्वर तालुक्याच्या विकासाला नवी गती, क्रांती व्यापारी संघटनेने यापुढेही मारळ येथे ३३ केव्ही सबस्टेशन, साखरपा-देवरुख स्वतंत्र लाईन, एमआयडीसीसाठी एक्सप्रेस फिडर आणि ताम्हाणे परिसरासाठी स्वतंत्र फिडर अशा महत्त्वाच्या मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या प्रकल्पामुळे भविष्यात उद्योग, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार असून वीज उपलब्धता हीच विकासाची गुरुकिल्ली असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. देवनगरी देवरुखला ऊर्जा सामर्थ्य प्राप्त करून देणार्या या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार शेखर निकम, संबंधित अधिकारी, निवृत्त अधिकारी कृष्णकुमार भोसले, आणि या लढ्याला सातत्याने दिशा देणार्या मंत्रालय वारी करणार्या क्रांती व्यापारी संघटनेचे संदीप वेल्हाळ, सुरेंद्र उर्फ भाऊ शिंदे, राहुल टाकळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आज ईएचव्ही पॉवर हाऊस मंजूर झाले... उद्या उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या क्रांतीची पहाट देवरुखमध्ये उगवेल, असे परिसरात म्हटले जात आहे.












































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.