loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत स्मार्ट मीटरवरून राजकीय राडा, शिवसेना उबाठा आक्रमक

रत्नागिरी - काल एमएसइडीसीएल ठाणे शाखेकडून कोकणातील लाखो वीज ग्राहकांना ४८ तासात स्मार्ट मीटर बसवू असा धमकीवजा एसएमएस गेला. त्यामुळे संपूर्ण कोकणात खळबळ उडाली. आपण लोकशाहीत राहतो की हुकुमशाहीत? असा सवाल सामान्य जनतेने उपस्थित केला. ग्राहकांच्या तक्रारीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी एमएसइडीसीएल कार्यालयावर धडकले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, जनतेला जसा महावितरणने ४८ तासात स्मार्ट मीटर बसवू असा दम दिला, तसाच दम आम्ही अधिकार्यांना देतो - तुम्ही ४८ तासात एक तरी मीटर बसवून दाखवा! मग बघू, असा इशारा देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी तालुकाप्रमुख मयुरेश पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत, उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, विभागप्रमुख किरण तोडणकर, शशी बारगोडे, महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोदड, महिला शहर संघटक सेजल बोराटे, नगरसेविका फौजिया मुजावर यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. केंद्राचा नियम: १ एप्रिल २०२६ पासून प्रीपेड सक्ती रद्द. ग्राहकाच्या संमतीशिवाय प्रीपेड करता येणार नाही.

टाईम्स स्पेशल

संचालक सचिन तळेवार यांनी स्पष्ट केलं की नवीन स्मार्ट मीटर फक्त पोस्टपेड राहतील, प्रीपेड नाही. सामान्य ग्राहकांना प्रीपेड नको, घर बंद असताना जबरदस्तीने मीटर बदलू नका. शिवसेना उबाठाच्या आक्रमक पवित्र्यानंतर एमएसइडीसीएल बॅकफूटवर जाण्याची शक्यता. कोकणात सध्या स्मार्ट मीटरची सक्ती थांबू शकते. ४८ तासाच्या मेसेजला घाबरू नका. प्रीपेड नको असल्यास लेखी अर्ज द्या. जबरदस्ती झाल्यास १९१२ वर तक्रार करा किंवा स्थानिक नेत्यांशी संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg