loader
Breaking News
Breaking News
Foto

जून महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात मुसळधार पाऊस जिथे कोसळायचा, अशा शेकडो गावात अद्याप पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही, यंदाची विदारक स्थिती!

राज्यात मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा कायम असून पावसाने दडी मारल्याने उन्हाचा चटका तारदाळ ठरत आहे. उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे देशातील उच्चांकी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली हंगामी कमी दाबाचा पट्टा पंजा पासून बिहार पर्यंत कायम आहे मध्य प्रदेश पासून मध्य महाराष्ट्र ते पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत तसेच पूर्व विदर्भ पासून तामिळनाडू पर्यंत हवेची कमी दाबाचे पट्टे आहेत. आग्नेयस अरबी समुद्रात केरळलगत समुद्रसपाटीपासून तीन किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे, हाच खरा पावसाचा अडथळा आहे त्यामुळे कोकणात पाऊस फिरावला असे म्हटले जात असले तरी अजूनही केरळमध्ये खऱ्या अर्थाने मान्सून दाखल झाले नाही असे म्हटले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या 24 तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी 42 अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर गोंदिया मालेगाव अकोला येथे 41 अंशापेक्षा अधिक तापमान नोंद झाली तर धुळे जळगाव गडचिरोली नागपूर आणि वर्धा येथे 40° पेक्षा अधिक तापमान ची नोंद झाली महाबळेश्वर येथे राज्यातील निश्चयांकित 17.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.जून महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात मुसळधार पाऊस जिथे कोसळायचा अशा शेकडो गावात अद्याप पाण्याचा एक थेंब पडलेला नाही अशी यंदाची पावसाची विदारक स्थिती आहे.

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात मुसळधार पाऊस कोसळायचा अशा शेकडो गावामध्ये आज पावसाचा एक थेंबही पडलेला नाही, गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचे जलश्रोत आटून गेले आहेत, धरणांचे पाणी आणखी वीस दिवस पुरेल इतकेच आता अनेक धरणांमध्ये उरले आहे. त्यामुळे इथे आठवड्यात पाऊस सुरू झाला नाही तर राज्यात मोठा दुष्काळ पडू शकतो अशी स्थिती असल्याचे शेतकरी वर्गातून म्हटले जात आहे. कोकणात जून महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी महापूर येत असे पण आज नद्या कोरड्या पडल्या आहेत अनेक वर्षानंतर अशी स्थिती आली आहे ,असे शेतकरी वर्गातून सांगितले जाते. कोकणात काही भागात पाऊस पडला त्यामुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याबाबत दिलासा आहे तरीही विहिरींचे पाणी तळाला गेले आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरे केले , आज या पेऱ्यांची विदारक अवस्था आहे अनेक ठिकाणी शेतकरी पेरणीला पाणी देत आहेत, मात्र ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचा जलशोध नाही अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भात पेरा रुजून येण्याऐवजी जागेवरच कोमेजून जाताना ते चित्र दिसून येत आहे. त्यामुळे यंदा उभार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची आज दयनीय अवस्था आहे याबाबत शासन स्तरावर विशेष प्रयत्न होण्याची गरज आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोकणात पेऱ्यांची विदारक स्थिती ,शेतकरी चिंतेत

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg