loader
Breaking News
Breaking News
Foto

अठरा गुणवत्ताधारक शिक्षक होणार केंद्रप्रमुख

खेड (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद शिक्षण विभागातील रिक्त असलेल्या केंद्रप्रमुख पदांवर खेड तालुक्यातील १८ गुणवत्ताधारक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. तालुक्यात केंद्रप्रमुख पदाच्या १६ जागा रिक्त आहेत. त्यापैकी १ जागा उर्दू केंद्रप्रमुखाची आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी ११ जून रोजी पूर्ण झाली असून, अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया पार पाडून रिक्त पदांवर नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तालुक्यातील रिक्त केंद्रप्रमुखांची आकडेवारी पाहता खेड तालुक्यातील उत्तीर्ण १८ शिक्षकांपैकी १५ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे खेड तालुका मिळण्याची शक्यता आहे, तर अन्य ३ शिक्षकांना तालुक्याबाहेर जावे लागणार आहे आणि उर्दू केंद्रप्रमुख पदासाठी अन्य तालुक्यातील शिक्षक येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

टाईम्स स्पेशल

खेड तालुक्यातील राहुल आनंद जाधव, बालाजी विश्वनाथ बोंबले, प्रियांका सवाईराम, अर्चना पाटील, सारिका दरेकर, नितीन शिंदे, प्रशांत भालेराव, चंद्रकांत दत्तात्रय कोरबु, सागर दौंड, अनिल सुकाळे, समीक्षा घाग, दत्तात्रय वाघमारे, दीपक सोनवणे, संजय लहू भोसले, तृप्ती म्हात्रे, संदीप जगताप, आशीष कदम व केशव नागरगोजे या शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांची लवकरच केंद्रप्रमुख पदावर वर्णी लागणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg