loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने २७ जून रोजी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

पनवेल, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील काँग्रेस पक्ष नव्या जोमाने संघटनात्मक बांधणीसाठी कार्यरत असून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत काँग्रेसची विचारधारा आणि पक्ष संघटना पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणे, त्यांच्याशी सातत्याने संवाद साधणे आणि रात्रंदिवस उपलब्ध राहून त्यांच्या अडचणी सोडविणारे प्रदेशाध्यक्ष अशी त्यांची ओळख राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याच अनुषंगाने डॉ. श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अधिकृत पनवेल विधानसभा १८८ इङअ-१ यंत्रणेमार्फत इङअ-२ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे संपन्न होणार आहे. या प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार, एसआयआर प्रशिक्षक अ‍ॅड. अरविंद कुमार द्विवेदी तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरीश केणी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रशिक्षणामध्ये मतदार यादीतील नावांची पडताळणी, नवीन मतदार नोंदणी, नावांमधील दुरुस्ती, मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना, इङअ-२ ची जबाबदारी, बूथ व्यवस्थापन तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या महत्त्वपूर्ण प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg