संगमेश्वर (प्रतिनिधी) - संगमेश्वर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका बाजूला पांगरी ग्रामपंचायत हद्दीत कोणत्याही वैध शासकीय परवानगीशिवाय राजरोसपणे डोंगरात शक्तिशाली भुसुरंग लावून बेकायदेशीर दगड उत्खनन केले जात आहे, तर दुसऱ्या बाजूला या सुरुंगांच्या तीव्र हादऱ्यांमुळे ज्या गरिबांच्या घरांना मोठे तडे गेले आहेत, त्यांनाच प्रशासनाने दरडक्षेत्र असल्याचे सांगत घरे खाली करण्याची नोटीस बजावली आहे. खाणमाफियावर कारवाई करण्याचे सोडून थेट पीडित गावकऱ्यांनाच "स्वतःच्या जबाबदारीवर सुरक्षित स्थळी जा, अन्यथा जीवितहानीस तुम्हीच जबाबदार राहाल" असा अजब आणि असंवेदनशील फतवा प्रशासनाने काढल्यामुळे पांगरी परिसरात तीव्र असंतोष पसरला आहे.
पांगरी ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन २५ मे २०२६ रोजीच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना दिली होती. ग्रामसभेत या बेकायदेशीर उत्खननाविरोधात रीतसर ठरावही मंजूर करण्यात आला होता. या पत्रात स्पष्ट नमूद केले होते की, या बेकायदेशीर सुरुंगांमुळे ग्रामस्थांच्या जीवितास व मालमत्तेस मोठा धोका निर्माण झाला आहे, घरे खचत आहेत, पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत आहेत आणि धुळीचे प्रदूषण वाढले आहे. परंतु, महसूल प्रशासन आणि पोलिसांनी यावर कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे हा खाणमाफिया अजूनही बिनदिक्कतपणे सुरुंगांचे स्फोट घडवून आणत आहे. असा आरोप ग्रामस्थानी केला आहे


















































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.