दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग ते विजघर रस्ता काम रस्ते विकास महामंडळ (एम.एस.आय.डि.सी.) अंतर्गत तीस किलोमीटर रस्ता काम सुरू आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ आम. दिपक केसरकर यांनी नुकतीच विकास कामे पाहणी संदर्भात दोडामार्ग तालुक्यातील काही गावात कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता दोडामार्ग ते विजघर रस्ता काम निकृष्ट दर्जाचे केले असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत रस्ते निर्माण मुख्य अभियंता रणजित हांडे यांची आम. दिपक केसरकर यांनी मुंबई येथे भेट घेऊन तातडीने निकृष्ट दर्जाचे केलेल्या कामाची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
दोडामार्ग ते विजघर रस्ता ईपीसी मॉडेल अंतर्गत सुरू आहे. या ठिकाणी दोन ठेकेदार कंपनी काम करत आहेत. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी शासनाच्या रस्ता निर्माण विकास महामंडळाचं कुणी नसतात. यामुळे ठेकेदार आपली मनमानी करत आहेत. सर्व मोर्या बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. दोडामार्ग ते तिलारी दरम्यान एकाही मोरी पाईप खाली बीबीएम किंवा सिमेंट काँक्रिट घातले नाही मातीवर पाईप घातले आहेत. काही जणांनी ठेकेदार याला विचारले असता असेच काम आहे असे सांगितले. निकृष्ट दर्जाचे मोर्या बांधकाम केले आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार दीपक केसरकर यांनी नुकतीच दोडामार्ग तालुक्याला भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी करून आढावा घेतला होता.
राज्य शासनाच्या रस्ते विकास महामंडळ योजने अंतर्गत कोल्हापूर नागणवाडी चंदगड रामघाट दोडामार्ग असनोडा राज्यमार्ग क्रमांक १८९ किमी ०/१०० ते किमी ३/०० तालुका दोडामार्ग, जिल्हा सिंधुदुर्ग या ईपीसी मॉडेल अंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असता रस्त्याच्या काही भागाचे निकृष्ट काम केल्याचे निदर्शनास आले. त्या संदर्भात एमएसआयडीसी चे मुख्य अभियंता रणजित हांडे यांची मुंबई येथे भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी पुढील आठवड्यात या भागाचा दौरा करून तक्रारीच्या अनुषंगाने सदर कामांची पाहणी पाहणी करून उचित करावी करण्याचे आश्वासन दिले. हांडे पुढील आठवड्यात या भागाचा दौरा करून पाहणी करणार आहेत. यामुळे ठेकेदार यांच्या निकृष्ट दर्जाचे काम लोकांना होणारा त्रास याबाबत काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.