loader
Breaking News
Breaking News
Foto

संभाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या व्यक्तीकडून स्मारकासमोर जाहीर माफी

संगमेश्वर (प्रतिनिधी) - छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या प्रकरणी कसबा परिसरातील एका व्यक्तीने शनिवारी संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर जाहीर माफी मागितली. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने शुक्रवारी सोशल मीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ही बाब लक्षात येताच शिवप्रेमी आणि भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाईची मागणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर संबंधित व्यक्तीने शनिवारी सकाळी संभाजी महाराजांच्या स्मारकासमोर येऊन आपल्या कृत्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त केली तसेच सोशल मीडियावरील संबंधित पोस्ट हटवली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांच्यासह अविनाश गुरव, चंद्रकांत जाधव, राकेश जाधव, सतीश पटेल, मिथुन निकम, उदय कमरकर, स्वप्निल सुर्वे, मयूर लिंबूकर, कोमल रहाटे, संतोष जाधव, बापू सुर्वे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्यात येईल, असा इशारा दिला. त्यांनी अशा प्रकारांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत भविष्यात अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असेही स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg