loader
Breaking News
Breaking News
Foto

आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त म्हसळा नगरपंचायतीत एकल महिलांचा सन्मान

म्हसळा - रायगड : आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त २३ जून रोजी म्हसळा नगरपंचायत कार्यालयात "एकल महिला दिन" उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, अविवाहित व निराधार महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सुनील शेडगे, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड तसेच नगरसेविका राखी करंबे यांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या सहाय्यक अधिकारी साधना प्रसाद पागी यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजना त्यांचे लाभ व अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनीही यावेळी विविध योजनांबाबत माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी म्हसळा नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला. एकल महिलांच्या सन्मानासोबतच त्यांना सामाजिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg