loader
Breaking News
Breaking News
Foto

डी.एड. कॉलेज मालवण येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

मालवण (प्रतिनिधी) - डी.एड. कॉलेज मालवण येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा.पूर्वा शिरसाट, प्रा.आनंदी घोगळे, प्रा. रमेश वळवी, कन्याशाळेच्या शिक्षिका करलकर, बार्टीचे समतादूत संग्राम कासले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य दत्तात्रय माळी यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यांनी योगाचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळी ७ ते ८ या वेळेत सामूहिक योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये डी.एड. महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच कन्याशाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली, शिस्त आणि सकारात्मक विचारांची जाणीव निर्माण झाली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg