loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत केव्हा होणार? प्रवाशांना मनस्ताप

रत्नागिरी (डिजीटल डेस्क) - कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकांचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक गाड्या ३ ते ४ तास उशिराने धावत आहेत. या बाबत धक्कादायक माहिती अशी की, कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या बहुतांश गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. डोंबिवली येथील श्रेयस पटवर्धन यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जाला मिळालेल्या उत्तरानुसार मार्गावरील गाड्यांचे अवघे २० ते ५२ टक्के इतकेच वेळ पाळण्याचे प्रमाण आहे. मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस १ नोव्हेंबर २०२५ ते १८ मे २०२६ या कालावधील १४२ फेेर्‍यांपैकी ११३ वेळा उशिराने धावली. या गाडीचे वेळ पाळण्याचे प्रमाण फक्त २०.४२ टक्के इतके निच्चांकी नोंदवले गेले. तर मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेसच्या ७८ फेर्‍यांमध्ये वेळ पाळण्याचे प्रमाण ४५.७ टक्के राहिले. एलटीटी-मडगाव एसी एक्सप्रेस ५२.६३ टक्के, मडगाव-एलटीटी एसी एक्सप्रेस ५२.६३ टक्के, करमाळी-एलटीटी एक्सप्रेस २५ टक्के आणि मंगळुरु-सीएसटी एक्सप्रेस ४२.४८ टक्के इतकी निराशाजनक कामगिरी राहिली आहे. याचा मनस्ताप प्रवाशांना झेलावा लागतोय. गेल्या दोन दिवसांत धावणार्‍या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले आहे. यावर कोकण रेल्वे महामंडळाने वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, कारण गाड्या उशिरा आल्याने याचा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. ग्रामीण भागात जाणार्‍या प्रवाशांना याचा फटका अधिक बसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg