loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील रजवेल येथे भीषण आग; १७ दुभती जनावरे मृत्युमुखी, माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्याकडून पाहणी

खेड - खेड तालुक्यातील रजवेल गावातील मेहमूद दाऊद हमदुले यांच्या गुरांच्या वाड्याला आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून मोठी हानी झाली. या आगीत गुरांचा संपूर्ण वाडा भस्मसात झाला असून तब्बल १७ दुभती जनावरे होरपळून मृत्युमुखी पडली आहेत. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच तिने संपूर्ण वाड्याला विळखा घातला. स्थानिक ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचा वेग मोठा असल्याने जनावरांना वाचविणे शक्य झाले नाही. या दुर्घटनेत हमदुले कुटुंबाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच भाजपा नेते खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी ॲड.वैभव खेडेकर त्यांनी मेहमूद हमदुले व त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले. या दुर्दैवी घटनेमुळे रजवेल परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीची मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

सदर वेळी खेडचे पोलीस निरीक्षक विवेक आयरे, खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, दाऊद हमदुले, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा रत्नागिरी सरचिटणीस वैजेश सागवेकर, मनोज दांडेकर, करण वैभव खेडेकर, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले तसेच स्थानिक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg