loader
Breaking News
Breaking News
Foto

आदर्श समाजभूषण पुरस्काराने अरबाज नेवरेकर यांचा गौरव

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - कै.बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव यांच्या वतीने आयोजित "नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड २०२६" सोहळ्यात लांजा येथील युवा समाजसेवक अरबाज नेवरेकर यांना "आदर्श समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोल्हापूर येथील रिजेंटा हॉटेल हॉलमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, उद्योग आणि समाजसेवा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. कल्पना इनामदार होत्या. तसेच प्रा. डॉ. शंकर अंदानी, डॉ. प्रकाश कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.

टाईम्स स्पेशल

अरबाज नेवरेकर हे सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि समाजहिताच्या कार्यात त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना "आदर्श समाजभूषण" या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg