loader
Breaking News
Breaking News
Foto

तुरळ येथे महामार्गावरील मोठ्या खड्ड्यामुळे कंटेनर पलटी; ग्रामस्थांचा संताप अनावर

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ स्टॉपजवळ गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास संगमेश्वरकडून चिपळूणच्या दिशेने जाणारा एक कंटेनर महामार्गावर पलटी झाला. प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर तुरळ व कडवई पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणच्या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तुरळ ग्रामपंचायतीने वारंवार संबंधित बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच स्थानिक आमदारांनीही शिफारसपत्र देऊन तातडीने दुरुस्तीची मागणी केली होती. विविध वृत्तपत्रांमधूनही या समस्येवर सातत्याने प्रकाश टाकण्यात आला होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून संबंधित बांधकाम विभागाने या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रत्नागिरी बांधकाम विभागाचे अधिकारी कुलकर्णी यांनी अनेकदा "उद्या काम सुरू करतो", "यंत्रणा पाठवतो" अशी आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप स्थानिक सरपंच व ग्रामस्थांनी केला. या दुर्लक्षामुळे अखेर मोठा अपघात घडल्याने संबंधित बांधकाम विभाग आणि कामाचा ठेकेदार यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

टाईम्स स्पेशल

"शासन झोपले आहे का? अधिकाऱ्यांना जनतेच्या जीविताची काहीच चिंता नाही का?" असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी, जबाबदार अधिकारी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा तुरळ व कडवई पंचक्रोशीतील ग्रामस्थ तीव्र आंदोलन आणि उपोषण छेडतील, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे प्रशासन किती तत्परतेने लक्ष देते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg