loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार जठारांवर कारवाईची मागणी

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - भारतीय संविधान निर्मिती प्रक्रिया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत गैरसमज निर्माण करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लांजा तालुका बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन सोमवारी लांजा तहसीलदारांना सादर करण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी अलीकडे झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये भारतीय संविधानातील अनुच्छेद ३७० संदर्भात जे नेहरूंना जमले नाही, जे संविधान कर्त्यांना जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करून दाखवले अशा प्रकारचे वक्तव्य केल्याची क्लिप विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झालेली आहे. अशा प्रकारचे वक्तव्य आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भारतीय संविधानाची निर्मिती, संविधानाची प्रक्रिया, संविधान सभेचे कार्य आणि त्यातील तरतुदी, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल गैरसमज संभ्रम अथवा चुकीची धारणा निर्माण करणारे ठरू शकते. आणि लोकशाहीच्या व्यवस्थेसाठी ते हितावह नाही. म्हणूनच संबंधित क्लिपची सत्यता, संदर्भ व उद्देश तसेच त्याचे समाजमनावर होणारे परिणाम यांची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच त्याची सखोल चौकशी करून याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

निवेदन सादर केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयघोष करण्यात आला. तसेच अशा प्रकारचे वक्तव्य करणारे आमदार प्रमोद जठार यांचा देखील जाहीर निषेध करण्यात आला. आमदार प्रमोद जठार यांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली. तहसीलदार प्रियंका ढोले यांना निवेदन सादर करताना अनिरुद्ध कांबळे, श्रीकांत कांबळे, प्रभाकर कांबळे, गौतम कांबळे, लहू कांबळे, एन.बी कदम, भिकाजी कांबळे, भिकाजी धनावडे, संतोष जाधव, रामचंद्र कांबळे आदींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg