loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा केंद्रशाळेत नवागत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

बांदा (प्रतिनिधी) - पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नंबर एक येथे शाळा प्रवेशोत्सव सोहळा जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी अध्यक्ष प्रमोद भाई कामत यांनी मुलांबरोबर पालकांचे कौतुक केले पहिली दाखल होणाऱ्या नवागतांचे स्वागत करताना बांदा शाळा ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी आणि जास्त पटसंख्या असणारी आणि गुणवत्तापूर्ण सर्वंकष व्यक्तिमत्व विकास घडवणारी माझ्या मतदारसंघातील शाळा आहे शाळेच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे शाळेच्या संदर्भात कोणतीही अडचण किंवा समस्या मला सांगा मी ती सोडवणार तसेच शाळेची महत्त्वाची समस्या म्हणजे इमारत येत्या काळात पूर्ण करणार असे आश्वासन दिले. नवीन इमारतीचं स्वप्न पूर्ण करून जिल्ह्यातील आदर्श शाळा विकसित करण्याचा माझा मानस आहे शाळेचा लौकिक वाढवण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक मेहनत घेत आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वीस विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतला. त्या सर्व पालकांचे कौतुक केले तर सर्व पालक आणि विद्यार्थी यांना बिस्किटे वाटप करून पहिल्या दिवशीच्या आनंदामध्ये भर घातली. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या नवागतांना फेटे घालून त्यांना सजवून बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रमोद कामत, व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा उपसरपंच रत्नाकर आगलावे, प्राधिकरण सदस्य रुपाली शिरसाट, गट शिक्षणाधिकारी सावंतवाडी शोभराज शेर्लेकर, माजी उपसरपंच राजाराम सावंत, जावेद खतीब, हेमंत मौर्य, संतोष बांदेकर, माजीं विद्यार्थी संघ अध्यक्ष अजय महाजन, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर, राधिका गवस, रक्षाली राणे, अन्वर खान, उर्मिला सावंत मौर्ये, म. गो .सावंत, समीर कल्याणकर, तसेच बहुसंख्य पालकांनी सहभाग घेतला. मिरवणूक प्रवेशद्वारावर आल्यावर नवागत विद्यात्यांचे पुष्पवर्षाव व औक्षण करून शाळेमध्ये प्रवेश करण्यात आला. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्याहस्ते सरस्वती पूजन व दिप प्रज्वलन करून सुरवात करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक असनकर यांनी केले. नंतर नवागतांना गुलाब पुष्प, पाठ्यपुस्तके आणि गणवेश एकत्रित देवून स्वागत करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

नंतर दानशूर व्यक्तींचे मान्यवरांच्या हस्ते आभार पत्रे देऊन आभार व्यक्त करण्यात आले. यामध्ये बाळकृष्ण वसंत कामत यांनी फिल्टर व लोखंडी रेलिंग साठी एक लाख बारा हजार रुपये देणगी दिली त्यांचे प्रतिनिधी म्हणून संतोष उर्फ दादा विरनोडकर यांनी आभार पत्र स्वीकारले. २००१ च्या इ ७वी च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या मागील गेट उभारणी साठी ५५,७०० देणगी दिली. हे आभार पत्र हनुमंत येडवे माजी विद्यार्थी यांनी स्वीकारले. डॉ संजय बर्वे यांनी २५००० रु अखंड बक्षिस योजनेसाठी देणगी दिली. तसेच ५००० रु समीर कल्याणकर यांनी पाण्याच्या टाकीसाठी देणगी दिली. नंतर याप्रसंगी अन्वर खान यांनी आपले विचार व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक असनकर यांनी तर आभार प्रदर्शन परब यांनी केले. सुत्रसंचालन सावळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी सुरक्षा समिती तसेच शिक्षक गजानन सावळ, कृपा कांबळे, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, प्रसेनजीत, जागृती धुरी, अर्चना देसाई, कृणाली मस्के, मनिषा मोरे, स्नेहा घाडी या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg