loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय दिना पाटील यांच्या डोक्यात हवा गेली आहेः सुषमा अंधारे

मुंबई - उद्धव ठाकरे शिवसेना गटाला सोडून बंडखोरी करीत खासदार संजय दिना पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. तीनच दिवसांत त्यांनी पत्रकारांना थेट जीवेमारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. पत्रकारांना खुलेआम धमकी दिल्यानंतर सध्या सगळीकडे व्हिडीओ व्हायरल होत आहे. या प्रकरणानंतर ठाकरे गटाने आक्रमत पवित्रा घेतला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेवून संजय दिना पाटील यांचा समाचार घेतला. संजय दिना यांच्या डोक्यात सत्ता गेली आहे. गृहमंत्र्यांनी यावर आपली भूमीका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. यावेळी त्या म्हणाल्या, या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. महिला सुरक्षित नाहीत. लोकलमधील प्रवासी सुरक्षित नाहीत. लोकप्रतिनिधींना विधिमंडळाच्या परिसरात धक्काबुक्की होते. म्हणजेच लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचेही काही खरे नाही. अधिकार्‍यांना खुल्या धमक्या दिल्या जात आहेत. आता पत्रकारांनाही धमकी दिली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg