मालवण (प्रतिनिधी) - मालवण तालुक्यातील खोटले येथील पालखी स्वामी भक्तांसह मंगळवारी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये विसावली. अधिक मासाचे औचित्य साधून मालवण खोटले येथून स्वामी भक्तांसह आलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराच्या पालखी सोहळ्याचे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वागत केले.
टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि श्री स्वामी समर्थच्या जयघोषात पालखीचे वटवृक्ष मंदिरात आगमन झाल्यानंतर पालखीसोबत आलेल्या स्वामी भक्तांच्या उपस्थितीत मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अधिपत्त्याखाली स्वामी दरबारात विशेष पूजा आणि आरती संपन्न झाली. या पालखी सोहळ्याचे आयोजन गणेश घाडीगावकर काका यांनी केले होते. यावेळी खोटले येथील श्री स्वामी समर्थ मंदीराचे मठाधीपती गणेश घाडीगावकर, समिती प्रमुख सल्लागार चंद्रकांत बंड, सचिव शैलेश सावंत, सदस्य नाना परब, उपाध्यक्ष विद्याधर गांवकर, कोश्याध्यक्ष विठ्ठल परब, अलका देवीदास विभुते यांचा मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वामी कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी मंदिराचे चेअरमन आदरणीय महेश मालक इंगळे यांच्या हस्ते पालखी सोहळा संयोजक आणि उपस्थित स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद देण्यात आला. यावेळी खोटले येथील स्वामीभक्तांनी स्वामी सेवेचा आनंद घेतला असून अक्कलकोट येथील स्वामी दरबारात मिळालेल्या स्वागताबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, श्रीकांत मलवे, महेश मस्कले आदींसह या सोहळ्यात खोटले ग्रामस्थ तसेच मुंबई व कोकण येथील स्वामीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.












































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.