loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी परशुराम भाऊ दांडेकर विद्यालयात प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

केळशी (मंगेश पाटील)- दापोली तालुक्यातील केळशी परशुराम भाऊ दांडेकर या नामांकित प्रशाळेमध्ये सोमवार दिनांक 15 जून 2026 रोजी प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत हा कार्यक्रम व शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश सोनवलकर व इतर सहाय्यक शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अशीच शाळेतील विद्यार्थ्यांना शासनामार्फत उपलब्ध असलेली पुस्तके यांचे वाटप करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेचा पहिला दिवस म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात ते पावसाळ्यातील दिवस हिरवेगार निसर्ग, अंगात रेनकोट, हातात छत्री आणि पावसात भिजत शाळेकडे निघालेली विद्यार्थीची लगबग अनेक पिढ्यांच्या आठवणीत कोरलेले हे चित्र यंदा मात्र पूर्णपणे बदललेले पहावयास मिळाले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत पावसाच्या सरीने नव्हे तर कडक उन्हाने व घामाच्या धारानी केले. यावर्षी शाळा सुरू होण्याच्या सुमारास रस्त्यावर साचलेले पाणी, अविनाश साचलेल्या पाण्यात उड्या मारत मारत शाळेत जाणारी मुले, मित्रांच्या अंगावर छत्रीचे पाणी उडवणारी मुले मी सर्वत्र हिरवागार निसर्ग असे चित्र पाहवयास मिळत होते. यावर्षी मात्र चित्र वेगळे होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg