वैभववाडी (प्रतिनिधी) - तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ चेक नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी खाजगी बसमधून गोवा बनावटीची सुमारे 36 हजार रुपये किमतीचे दारू जप्त केली. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री 2:40 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी बस क्लीनर सचिन बाबासाहेब इरकर (वय 23, रा.कात्रज, पुणे) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करूळ चेक नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल संदीप राठोड व हरीश जायभाय हे नेहमीप्रमाणे वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी गोव्याहून कोल्हापूरकडे जाणारी एक खाजगी ट्रॅव्हलर्स बस तपासणीसाठी थांबवण्यात आली. बसमध्ये चालक दत्तात्रय गुलाब इलापे, अमोल सुभाष कोंढाळकर आणि क्लीनर सचिन इरकर होते.
बसची तपासणी करताना पोलिसांनी डिक्या उघडण्यास सांगितले असता क्लीनरने सर्व डिक्या उघडून दाखवल्या. मात्र एक डिकी लॉक असून ती उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी संबंधित डिकी उघडून पाहिली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूचे तीन बॉक्स आढळून आले. दारूबाबत चौकशी केली असता वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. याची माहिती पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार, सचिन इरकर याला दारूसह ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. त्यानंतर इरकर याला वैभववाडी पोलीस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.