loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्प शासनाच्या ताब्यात द्या - भाजपा आमदार प्रमोद जठार

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्रकल्पाला भाजपा आमदार प्रमोद जठार भेट देऊन पाहणी केली. खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील सामूहिक रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अर्थात सीईटीपी चा कारखानावर आमदार प्रमोद जठार यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सीईटीपी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रकल्पाचा व्यवस्थापनावर टीका करत हा प्रकल्प शासनाच्या ताब्यात देण्याची मागणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोटे एमआयडीसीतील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केले जाणार नसल्याचे आमदार प्रमोद जठार यांनी स्पष्ट केले. तसेच या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्रांची चर्चा करून ठोस निर्णयासाठी पाठपुरावा करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितलं, लोटे परिसर प्रदूषण मुक्त करण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला जाईल असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

सदरवेळी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष ॲड.वैभव खेडेकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम भाई सहिबोल, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अँड.मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, भाजपा रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी सदस्य निलेश बामणे, भाजपा खेड तालुका सरचिटणीस शुभम गायकवाड, स्वराज गांधी, प्रदीप भोसले, ओवैस चौगुले, पप्पू नीमनकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg