loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेना महिला सेनेच्या मालवण- कुडाळ तालुका प्रभारीपदी पूनम चव्हाण यांची नियुक्ती

मालवण, (प्रतिनिधी) - शिवसेना महिला सेनेच्या मालवण कुडाळ तालुका प्रभारीपदी मालवण नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा आरोग्य सभापती सौ. पूनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे कुडाळ मालवण तालुक्यातील महिला संघटनेला नवचैतन्य मिळणार असल्याची भावना शिवसैनिकांमधून व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक सक्षम करणे, महिला सेनेचे कार्य गावागावांत आणि तळागाळातील महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, तसेच महिलांना पक्षाशी जोडण्यासाठी सक्रियपणे काम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सौ. पूनम चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते यांच्या हस्ते सौ. पूनम चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, चित्रा हरमळकर, विद्या फर्नांडिस, सौ. प्रभाळे, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी हडकर, अक्षता गावडे यांच्यासह शिवसेना महिला सेनेच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नियुक्तीनंतर सौ. पूनम चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, महिला सक्षमीकरण आणि संघटन विस्तारासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg