loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात 'महाआरोग्य शिबिर' संपन्न

​कर्जत (जयेश जाधव) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजस ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत तालुक्यातील बेकरेवाडी येथे 'महाआरोग्य शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. अं. पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर उत्साहात संपन्न झाले. या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात रुग्णांची मोफत बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, रक्ताच्या विविध चाचण्या, ईसीजी आणि डोळे तपासणी करण्यात आली. तसेच गरजू रुग्णांना मोफत औषध वाटपही करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच गरजू रुग्णांना मोफत औषध वाटपही करण्यात आले. आरोग्य शिबिरासोबतच येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ आरोग्यच नव्हे तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जितेंद्र पाटील म्हणाले की, "सध्या वाढत असलेल्या कडक उन्हाचा विचार करता, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येकाने वृक्षलागवडीसाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी विशेष भर दिला पाहिजे."

टाईम्स स्पेशल

या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिव्या, डॉ. मयुरी मोहिते, समाधान पाटील आणि त्यांच्या सर्व स्टाफनर्सचे विशेष वैद्यकीय सहकार्य लाभले. याप्रसंगी मनसे नेते जितेंद्र पाटील, किशोर शितोळे यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विशाल बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेश संघटक विजय मोहिते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जैतू कराळे, तसेच बेकरेवाडीतील ग्रामस्थ नामदेव निरगुडा, रमेश पारधी, गजानन पारधी, बुधाजी पारधी, जयेंद्र निरगुडा, राजेश निरगुडा यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg