वरवेली (गणेश किर्वे) - श्री संताजी संग्राम क्रिकेट संघ, गुहागर तेलीवाडी यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आयोजित करण्यात आलेला मोफत वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन जीवन शिक्षण शाळा, गुहागर नं. १ येथे मोफत वह्या व विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत एकूण २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. वह्या व शैक्षणिक साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.
या कार्यक्रमासाठी चंद्रकांत झगडे, प्रशांत प्रभाकर रहाटे, स्वप्निल राऊत, ऋषिकेश रहाटे, बापू रहाटे, संतोष राऊत, राकेश राऊत, अथर्व राऊत, रोशन यादव, राजेश पवार, संजय पवार, कृष्णा रहाटे, विश्वनाथ रहाटे, अंकुर रहाटे, दीपक महाडिक, संतोष रहाटे, महेश रहाटे, विशाल पवार, योगेश वेस्वीकर, प्रदीप वेस्वीकर, शौर्य कांबळे आणि आरुष कांबळे यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच संदीप रहाटे, अरविंद रहाटे, साकेत चव्हाण, अनिकेत महाडिक, दीपक महाडिक, समीर महाडिक, दिनेश खेडेकर आणि स्पृहा यांचे विशेष सहकार्य लाभले.

















































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.