loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवई प्रभाग समितीची बैठक संपन्न

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - कडवई प्रभाग समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या अध्यक्षतेखाली तुरळ ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झाली. जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रभाग सभेला सुशील भायजे, दत्ता लाखन, कृष्णा हरेकर, जिल्हा परिषद सदस्या विशाखा कुवळेकर, पंचायत समिती सदस्या अपर्णा जाधव, तुरळ सरपंच हरेकर, श्रीनिवास फणसे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीस कडवई जिल्हा परिषद गटातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत घरकुल योजनेंतर्गत विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. लाभार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती ग्रामसचिवांनी दिली. यावेळी बोलताना संतोष थेराडे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक लाभार्थी आर्थिक अडचणींमुळे हतबल झालेले असतात. अशा लाभार्थ्यांची नावे द्यावीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्या लाभार्थ्यांचे हप्ते ज्या बँकेत जमा होतात, त्या बँकांच्या संचालकांशी चर्चा करून वैयक्तिक कर्जप्रकरण अथवा सोसायटीच्या माध्यमातून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत घरकुल योजनेचा कोटा पूर्ण झाला पाहिजे, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. काही लाभार्थ्यांची घरे पूर्ण झाली असूनही त्यांना दुसरा हप्ता अद्याप प्राप्त झालेला नसल्याचा मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला. त्यावर संबंधित लाभार्थ्यांना लवकरात लवकर हप्ता वितरित करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. ग्रामीण भागातील कमी पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या स्थितीत असल्याचे तसेच काही शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याचे सभेच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यावर संबंधित शाळांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी तसेच प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग पाठपुरावा करून खड्डे भरण्यात यावेत यासाठी पाठपुरावा करण्यात यावे असे ठरत कोणतीही बस बंद होणार आहेत यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. 15 व्या वित्त आयोग निधी परत जाणार नाही यासाठी सरपंच, ग्रामसेवक यांना सक्त सांगण्यात आले. बैठकीत विविध विकासकामे, शासकीय योजना आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg