loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना

रत्नागिरी (जमीर खलफे): शहरातील मारुती मंदिर परिसरातील शर्वाणी हॉलमध्ये १८ जून रोजी आयोजित एका पत्रकार परिषदेत ‘युवा क्रांती सेना’ या नव्या राजकीय पक्षाची अधिकृत स्थापना जाहीर करण्यात आली. पक्षाचे संयोजक जुनेद मज्जिद बंदरकर यांनी या नव्या पक्षाची अधिकृत भूमिका आणि जाहीर निवेदन सादर केले. कोकणची अस्मिता, स्थानिकांचे हक्क, रोजगार, निसर्ग संरक्षण आणि युवकांच्या भविष्यासाठी उभे राहिलेले हे एक जनआंदोलन असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारांवर आधारित हा पक्ष काम करणार असून यामध्ये कोणत्याही प्रकारची हाय-कमांड संस्कृती नसेल आणि सर्व निर्णय प्रक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून होईल, असा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात विविध पदांवर काम केलेल्या या पदाधिकार्‍यांनी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली, याचे कारणही यावेळी स्पष्ट केले. यावेळी सचिन शिंदे, शकील गवाणकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg