loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड-दापोली मार्गावरील साखरोळी येथे मानवी हाडांचा सांगाडा आढळला; परिसरात खळबळ

खेड : खेड-दापोली मार्गावरील साखरोळी परिसरात मानवी हाडांचा सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून सांगाडा पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आला असून तो कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्राथमिक माहितीनुसार, आढळलेला सांगाडा पुरुषाचा आहे की महिलेचा, तसेच त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी खेड पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. शववैद्यकीय व न्यायवैद्यक अहवालानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg