loader
Breaking News
Breaking News
Foto

बावनदी येथे कोळसा वाहतूक करणारा डंपर पलटी; सुदैवाने चालक बचावला

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे शनिवारी रात्री कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उडी घेतल्याने त्याचा जीव बचावला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा ट्रक बावनदी परिसरात आला असता हा अपघात घडला. महामार्गावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झाला.अपघातानंतर ट्रकमधील कोळसा आणि राख मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखुरली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून चालक सुखरूप बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg